कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नगर मध्ये येत नामदार शंकरराव गडाख यांनी केले हे काम !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नगरमध्ये प्रथमच येणारे शंकरराव गडाख यांनी माजी मंत्री तथा सेनेचे उपनेते अनिल राठोड यांची भेट घेतली. त्यासाठी ते चितळे रस्त्यावरील ‘शिवालया’त पोहचले.

दोघांत बंद दाराआड पंधरा मिनिटे चर्चा झाली. सेनेचा जयघोष करत मंत्री गडाख यांचा शिवसैनिकांनी सत्कारही केला.

हे पण वाचा :- आमदार बबनराव पाचपुते यांच्या समर्थक सरपंचाचे पद अखेर रद्द

कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यनंतर शंकरराव गडाख प्रथमच नगर शहरात आले. सर्वात अगोदर त्यांनी शिवसेनेचे संपर्क कार्यालय म्हणून ओळखले जाणारे ‘शिवालय’ गाठले.

हे पण वाचा :- आमदार निलेश लंके म्हणाले मंत्रिपदापेक्षा ही गोष्ट माझ्यासाठी महत्वाची !

तेथे अनिल राठोड यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली. शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी तेथे होते. चर्चेनंतर मंत्री गडाख यांचा शिवसैनिकांनी जयघोष करत सत्कार केला.

हे पण वाचा :- राष्ट्रवादीचा हा नेता होणार अहमदनगरचा पालकमंत्री ?

अनिल राठोड यांनी सलग पाच टर्म नगरमधून शिवसेनेचे प्रतिनिधीत्व केले. मात्र गत दोन टर्मपासून त्यांना पराभवाचा सामना करावा लागत आहे.

हे पण वाचा :- खासदार सुजय विखे म्हणाले ‘विखे पॅटर्न’ संपलेला नाही !

राठोड यांचे पुर्नवसन करावे यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही भेटले आहे.

हे पण वाचा :- या कारणामुळे प्राजक्त तनपुरे झाले मंत्री खुद्द शरद पवारांनीच दिले स्पष्टीकरण !

राठोड यांना विधानपरिषद देऊन त्यांचे पुर्नवसन होणार की महामंडळ देऊन समाधान केले जाणार याकडे नगरकरांचे लक्ष असतानाच गडाख-राठोड यांची बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे अनेक तर्कविर्तक काढले जात आहे.

हे पण वाचा :- वाढदिवसाला आणली तलवार आणि नंतर झाले असे काही…

नगर शहरात शिवसेनेत गटबाजी उफाळून आली आहे. मंत्री पदाची शपथ घेतलेले गडाख यांच्या भेटीसाठी नगरसेवक अनिल शिंदे, माजी नगरसेवक अनिल लोखंडे थेट सोनईत पोहचले.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : सावेडीत हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या अड्डाच्या पर्दाफाश

तर आज मंत्री गडाख शिवालयात आले. तेथे उपस्थित शिवसैनिक पाहता शिवसेनेतील गटबाजी पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24