अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- चंद्रकांत पाटील यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर त्याची राज्यभर जोरदार चर्चा झाली.
शरद पवार हे अभ्यास नसलेले छोटे नेते आहेत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यावरून पाटील यांच्यावर टीका सुरू झाल्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं.
शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल मी नेहमीच चांगलं बोलत आलो आहे. माझा रोख मराठा आरक्षणाच्या मुद्द्यापुरताच होता. शरद पवारांचा अनादर करण्याचा कुठलाही हेतू नव्हता, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
तुम्ही नरेंद्र मोदी, अमित शाहांवर टीका करता. देवेंद्र फडणवीसांना ‘टरबुज्या’ म्हणता, मला ‘चंपा’ म्हणता. ते कसं चालतं? असा सवालही त्यांनी केला. “शरद पवारांबद्दल चुकीचे बोलण्याचा हेतू नव्हता.
कुणालाही दुखावण्याची इच्छा नव्हती. मात्र नव्याने कुणाला आरक्षण देताना जुन्या आरक्षणाला धक्का लागू नये, हाच माझा बोलण्याचा हेतू होता.
त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कायदेशीर तरतुदींच्या दृष्टीने मी बोलत होतो. राष्ट्रवादीचे नेते देवेंद्र फडणवीसांना टरबुज्या म्हणतात, मला चंपा म्हणतात, ते कसे चालते?” असा सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved