‘त्या’ पोलिसाला शोधण्यासाठी एनडीआरएफला पाचारण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- पारनेर तालुक्यातील प्रसिद्ध असंलेल्या रुई चोंडा धबधब्यावर रेल्वेचे 4 पोलीस परवा दुपारी तीनच्या सुमारास आले होते.

तेथे फोटो काढत असताना एक पोलीस अचानक डोहामध्ये फसला गेला त्याच्या सोबतच्या मित्रांनी स्थानिकांना याबाबत माहिती दिली.

त्याचा शोध सुरू असून येथील पथकास अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे एनडीआरएफला पाचारण करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.

हा डोह जवळपास 70 फूट खोल आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.बडदे व अग्निशमन अधिकारी मिसाळ यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे प्रशासनाने अथक प्रयत्न केला.

त्याचबरोबर पारनेर पोलीस निरीक्षक राजेश गवळी हे पथकासह शोधाशोध घेत आहेत. रेल्वे पोलीसांचे पथक शोध घेण्यासाठी आले आहे.

स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहीम राबवली जात आहे. मात्र त्यात यश आले नाही. शोध लागत नसल्याने अखेर पुण्यावरून एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24