अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :-पाथर्डीत अकरावी प्रवेशासाठी चालु शैक्षणिक वर्षात सरसकट सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी लागणारे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे अशी मागणी पाथर्डी तालुका मनसेच्या वतीने प्रांताधिकारी देवदत्त केकान यांच्याकडे करण्यात आली.
कोरोना महामारीच्या संकटामुळे मागील सहा सात महिन्यांपासून सर्वत्र आर्थिक उलाढाल ठप्प आहे,सध्या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता तालुक्यातील अनेक महाविद्यालयात ११ वी प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया चालू आहे.
यातील अनेक महाविद्यालयात अनुदानित व विनाअनुदानित तुकड्या असुन बहुतांश महाविद्यालयात अनुदानित तुकड्यांतील शिक्षकच विनाअनुदानित तुकड्यांमध्ये शिकवत आहेत.
आता या चालु शैक्षणिक वर्षात जेमतेम तीन चार महिन्यांचाच शैक्षणिक कालावधी शिल्लक आहे व असे असतानाही बहुतेक सर्वच महाविद्यालय
११ वी प्रवेशासाठी पुर्ण शैक्षणिक वर्षाचे संपुर्ण शैक्षणिक शुल्क आकारले जाते आहे. यामुळे परिस्थितितीचा विचार करत शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे अशी मागणी मनसेने केली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved