करिअर अकादमी मुळे ग्रामीण भागातील मुलांना संधी उपलब्ध -आ पाचपुते

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-कौटिल्य करिअर अकादमीचे विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य आहे असे उदगार आमदार बबनराव पाचपुते यांनी क्रीडा संकुलाचे मैदानावर अकादमीच्या पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन प्रसंगी बोलताना केले .

श्रीगोंदा शहरात कौटिल्य करिअर अकादमी आहे या अकादमी मध्ये पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण दिले जाते या अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मैदानी सराव करण्यासाठी क्रीडांगणाची गरज होती

त्यामुळे आमदार बबनराव पाचपुते यांनी या अकादमीसाठी क्रीडा संकुलाची मोकळी जागा उपलब्ध करून दिली आज या प्रशिक्षण वर्गाचे आमदार बबनराव पाचपुते ,भाजप चे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे ,

जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडिक ,तालुकाध्यक्ष संदीप नागवडे भाजप सोशल मीडियाचे महेश क्षीरसागर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले यावेळी बोलताना आमदार पाचपुते म्हणाले ,

ग्रामीण भागातील मुलांनी राज्य शासनाच्या सेवेत दाखल झाले पाहिजे अश्या करिअर अकादमी मुळे ग्रामीण भागातील मुलांना संधी मिळत असते या कौटिल्य करिअर अकादमीचे विद्यार्थी हे देशाचे उज्ज्वल भविष्य आहे

असे शेवटी आ पाचपुते म्हणाले यावेळी अकादमीचे संचालक संतोष धुमाळ शीतल धुमाळ ,प्रशिक्षक किरणबंड ,सुदर्शन रामफुले अमोल सोनवणे यांनी उपस्थितांचा सत्कार केला

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24