महाराष्ट्र

‘सावधान… शरद पवारसाहेब तुम्हाला विनंती, तुम्ही

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :-  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भाजपचे अनिल बोंडे यांनी विनंती वजा इशारा दिला आहे की, शरद पवार यांनी अमरावतीत पाय ठेवू नये.

शरद पवार हे विदर्भाचा दौरा करीत आहेत, ते कोणत्या तोंडाने करीत आहेत हे माहित नाही, असं देखील अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे. अनिल बोंडे यांनी शरद पवार यांना इशारा आणि विनंती करताना म्हटलं आहे,

पवारसाहेब तुम्ही अमरावतीत येऊ नका, तुम्हाला नागरीक आणि शेतकऱ्यांच्या मोठ्या रोषाला सामोरं जावं लागेल. अनिल बोंडे यावर पुढे बोलताना म्हणाले, अमरावतीत ज्या ४० हजार मुस्लिमांना मोर्चा काढला, नंगा नाच केला,

त्यामागे नवाब मलिक आहेत, या नवाब मलिकांसोबत दंगलीच्या सुत्रधारांचे फोटो झळकत आहेत, या नवाब मलिकांचे संरक्षक हे शरद पवार आहेत. तरी देखील शरद पवार कोणत्या तोंडाने विदर्भ दौऱ्यावर येत आहेत, ते समजत नसल्याचं अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे.

Ahmednagarlive24 Office