अजित पवार उपमुख्यमंत्री होताच नगर जिल्ह्यातील या गावात जल्लोष !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- महाराष्ट्रात जवळपास दोन आठवड्यांनंतर राष्ट्रपती राजवट संपली आणि नवं सरकार स्थापन झालं. सत्तासंघर्षात भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा बाजी मारत आपलं सरकार स्थापन केलंय .

आज सकाळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांचे जन्मगाव असलेल्या देवळाली प्रवरा येथे  आनंद व्यक्त करण्यात आला.

येथील भाजप कार्यकर्ते प्रकाश पारख यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार विराजमान झाल्यानंतर जल्लोष साजरा केला.

अजित पवार यांचे देवळाली प्रवरा हे आजोळ असून स्व. सर्जेराव कदम व स्व. आण्णासाहेब कदम हे त्यांचे मामा होते. आजोळी पवार यांचा जन्म झाला होता.

आज सकाळीच अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष व्यक्त केला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24