अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- मराठा आरक्षणाच्या कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे.
परंतु या सर्व घडामोडींमुळे मराठा समाज अस्वस्थ झाला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने तातडीने पावले उचलून काही बाबींवर त्वरीत कार्यवाही करावी,
यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आज (सोमवार) जिल्ह्यातील तहसीलसमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. मराठा क्रांती मोर्चाने आता केंद्र सरकारलही इशारा दिला आहे.
मराठा समाजाच्या सहनशीलतेचा आणखी अंत न पाहता मागण्यांबाबत तात्काळ निर्णय घ्यावा. अन्यथा मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाचा वणवा पुन्हा पेटल्यास त्यास केंद्र व राज्य सरकार पूर्णतः जबाबदार राहील,
अशा इशाराही देण्यात आला आहे. केंद्र सरकारने मराठा आरक्षणास संरक्षण देण्यासाठी संसदेत स्वतंत्र कायदा करावा, सर्वोच्च न्यायालयातून जलद न्याय मिळण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करावा, अशीही मागणी आता करण्यात आली आहे.
* ह्या आहेत मागण्या :-
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved