राज्यात गडगडाटासह पावसाची शक्यता

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

भारतीय हवामान विभागाने रविवार आणि सोमवारी राज्यात काही ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. उत्तर आणि दक्षिण कोकणातही पावसाची शक्यता आहे

तर त्यानंतर मंगळवारपर्यंत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात हे वातावरण कायम राहू शकते. रविवारी ठाण्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ढगांच्या द्रोणीय स्थितीमुळे पावसाची शक्यता निर्माण झाल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

मुंबई आणि पालघरमध्ये वातावरण कोरडे राहून ठाण्यात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगडमध्येही रविवारी आणि सोमवारी पावसाचा अंदाज आहे.

रविवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे तुरळक ठिकाणी गडगडाटासह वीजांचा लखलखाटही होऊ शकतो तर सोमवारी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नाशिक, अहमदनगर, पुणे येथे रविवार आणि सोमवारी दोन्ही दिवस जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथे मंगळवारपर्यंत अशी स्थिती कायम राहू शकते.

मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली येथे रविवारी जोरदार वाऱ्यांसह पाऊस तसेच गडगडाट आणि वीजांचा लखलखाटाचा इशारा देण्यात आला आहे.

नांदेड, उस्मानाबाद, लातूर येथे मंगळवारपर्यंत पावसाची आणि गडगडाटाची शक्यता आहे. विदर्भात अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ येथे तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.

तर भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया येथे याची व्यापकता अधिक असेल.

अहमदनगर लाईव्ह 24