अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- “चंद्रकांत पाटील हे चंपारण्यातील एक पात्र आहेत. ते नेहमीच भ्रमण करत असतात. त्यांच्या सोयीच्या ठिकाणी ते थांबतात,” अशी खोचक टीका मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.
चंद्रकांत पाटील पुण्यातील अटल संस्कृती गौरव पुरस्काराच्या वितरण सोहळ्यात शुक्रवारी (25 डिसेंबर) बोलत होते. यावेळी बोलताना ‘पुण्यात प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं. पण देवेंद्र मी तुम्हाला सांगतो, मी कोल्हापूरला परत जाणार आहे.
विशेषत: मला विरोधकांना ही गोष्ट सांगायची आहे,’ असे वक्तव्य त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय गोटात चांगल्याच प्रतिक्रिया उमटल्या.
पाटलांच्या याच वक्तव्यावर बोलताना “चंपारण्यात एक पात्र आहे. हे पात्र नेहमी भ्रमण करतं त्यांच्या सोयीच्या ठिकाणी ते थांबत आणि गैरसोय झाली की हे पात्र बदलतं. या पात्रामध्ये चंद्रकांत पाटील असावेत,” असे म्हणत वडेट्टीवार यांनी पाटलांवर खोचक टीका केली.