अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- एकमेकांच्या नावावरून विशेषणं लावणे आता बंद करायला हवीत, सर्वच पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित बसून याविषयी ठरावयला हवे, अशी उद्विग्न भावना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
मर्यादा राखून आम्ही पण उद्धव ठाकरे यांना ‘उठा’, शरद पवारांना ‘शपा’, जयंत पाटीलांना‘जपा’ असे बरेच काही म्हणू शकताे, असेही त्यांनी नमूद केले.
चंपा , टरबूज या नावांचा उल्लेख करीत पाटील यांनी राजकीय व्यक्तींकडून एकमेकांच्या नावाने केली जाणारी टिपण्णीवर नाराजी व्यक्त केली.
ही अशा पद्धतीची भाषा थांबली पाहीजे. यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी बंद खाेलीत चर्चा करायला हवी असे त्यांनी नमूद केले.
महाविकास आघाडी राज्य सरकारच्या वर्षपुर्तीच्या कालावधीसंदर्भात पत्रकार परीषदेत पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली. यावेळी खासदार गिरीश बापट,
शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापाैर मुरलीधर माेहाेळ, राजेश पांडे, धीरज घाटे, हेमंत रासने , गणेश बीडकर आदी पदाधिकारी उपस्थित हाेते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved