अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चांगलेच फटकारले आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे ताळतंत्र सुटले आहे. ते काय बोलताय याचे त्यांना भान राहिले नाही.
शरद पवार यांना जे छोटे नेते म्हणत आहे, त्यांना राजकारणाची उत्तुंगता पाहणे झेपले नाही, अशा शब्दात त्यांनी चंद्रकांत पाटील यांना सुणावले आहे. संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली.
शरद पवार यांना जे छोटे नेते म्हणत आहे, त्यांना राजकारणाची उत्तुंगता पाहणे झेपली नाही. मोदी सरकारनेच शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार दिला आहे. हे बहुदा चंद्रकांत पाटलांना माहिती नसावे.
त्यांनी पंतप्रधान कार्यालयाकडून माहिती घ्यावी. पंतप्रधान मोदी हे शरद पवार यांच्याकडून मार्गदर्शन घेत होते, हे ही लक्षात घ्यावे, असा टोलाही राऊत यांनी पवारांना लगावला. चंद्रकांत पाटील आणि भाजपमध्ये वैचारिक दरी निर्माण झालेली आहे.
किंवा पंतप्रधान मोदी जे काही सांगत आहे, त्यांचा संदेश नेत्यांसोबत पोहोचत नाही. किंवा हे नेते पंतप्रधान मोदींना जुमानात नाही.
तुम्ही राजकारण नक्की करा, पण व्यक्तिगत स्तरावर बोलत असताना राजकीय उत्तुंग स्तरावर असलेल्या नेत्यांबद्दल इतक्या खालच्या स्तराला जावून तुम्ही बोलू नका, असा सल्लाही राऊत यांनी दिला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved