शिर्डी साईबाबां नंतर जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शन वेळांमध्ये बदल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-राज्यातील अनेक मंदिरांमध्ये होणारी गर्दी पाहता आता त्या मंदिरांमध्ये दर्शन वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत. शिर्डीतील साईबाबा मंदिरामागोमाग, आता जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये दर्शन वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे.

दरम्यान कोरोना विषाणूचा संसर्ग फोफावू लागल्यानंतर महाराष्ट्रात मंदिरंही बंद करण्यात आली होती. लॉकडाऊन अंतर्गत हे पाऊल उचलण्यात आलं होतं.

पण, काही काळानंतर नियमांमध्ये शिथिलता आणण्यास सुरुवात झाली आणि नागरिकांना मोकळीक मिळाली. अनेक ठिकाणी नागरिकांची ये-जा सुरु झाली.

पण, यामध्ये नियमांचं मात्र सर्रास उल्लंघन होताना दिसलं. ज्यामुळं आता पुन्हा एकदा कोरोना निर्बंध लागू करण्यासाठी प्रशासन पावलं उचलताना दिसत आहे.

जेजुरी च्या खंडेरायाचं मंदिर आता सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुलं राहणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने 28 मार्च 2021 च्‍या कोविड- 19 संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना लागू केल्या.

त्यानुसार आता जेजुरीत खंडोबाच्या दर्शन वेळेत बदल करण्यात आले आहेत. भाविकांना दर्शनासाठी मंदिर सकाळी 7 ते संध्याकाळी 8 या वेळेत खुले राहणार आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24