अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने सर्वत्र काही नियमांची अमंलबजावणी करण्यास सांगितले आहे. तसेच हे नियम सर्वाना बंधनकारक आहे.
मात्र श्रीगोंद्याचे माजी सभापतींनी नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि,
बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी दि 15 सप्टेंबर रोजी लोणीव्यंकनाथ सहकारी सोसायटीत जिल्हा सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांचे हस्ते
सभासदांना कर्ज वाटप मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याचा ते रविंद्र बोरुडे यांची तीन चाकी रिक्षा मधून भोंगा लावून प्रचार करीत होते
ही घटना दि 14 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता लोणीव्यंकनाथ ग्रामपंचायती समोर घडली त्यानुसार पोलिस काॅस्टेबल संतोष कोपनर यांनी गुन्हा दाखल केला.
पुढील तपास पोलिस हेड काॅस्टेबल व्ही एम बढे करीत आहेत. अशा पध्दतीने कोणी रस्त्यावर येऊन नियमाचे उल्लंघन केले तर पोलिस कायदेशीर कारवाई करतील असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved
.
Reserved