अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- कॉस्मेटिकचे नवीन दुकान टाकण्यासाठी सोळा लाख रुपये माहेराहून आणावेत यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून त्रास दिला.
याप्रकरणी पती सुहास बाबुराव साठेसह सात जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, माहेरहून पैसे आणावे यासाठी या विवाहितेवर दबाव वाढत होता.
पती सुहास साठे व सासरा बाबुराव साठे, सासू शकुंतला साठे, दीर विजय साठे, अजय साठे, मीनाक्षी विजय साठे, रुपाली अजय साठे (सर्व रा. रामचंद्रनगर, ज्योती पार्क, धनकवाडी, पुणे) यांनी मानसिक व शारीरिक छळ करून घराबाहेर काढून दिले असल्याची फिर्याद मेघना सुहास साठे (३५) यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
पोलिसांनी फिर्यादीची तक्रार दाखल करून विवाहितेच्या नवऱ्यासह तब्बल सात जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.