अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- बेलापूर येथील महाविद्यालयात १२ वीची पूर्व परीक्षा सुरू असताना कॉपी तपासण्याच्या बहाण्याने एक मुलीच्या अंगाला स्पर्श करून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी बाबुराव पांडुरंग कर्णे या प्राध्यापकाविरुद्ध पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून बेलापूर पोलिस ठाण्यात विनयभंग, तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पण वाचा :- अहमदनगर जिल्ह्यातून तब्बल 332 अल्पवयीन मुलींचे अपहरण !
याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे आपली मुलगी बेलापुरात महाविद्यालयात इयत्ता १२ वीत शिकते आहे. शनिवारी जीवशास्राचा पेपर होता. या वर्गावर प्राध्यापक बाबुराव कर्णे हे पर्यवेक्षण करीत होते.
हे पण वाचा :- ‘लोकनेते’ हे पद विखे पाटील परिवारासाठी इतर पदापेक्षा सर्वात मोठे – खा. सुजय विखे पाटील
पीडित मुलीच्या शेजारी बसलेल्या मुलीस पर्यवेक्षक कर्णे यांनी तिची कॉपी पकडली व तिला बेंच वरून उठवून देऊन आणखी कॉफी आहे काय या बहाण्याने पीडित मुलीचे शेजारी बसून अंगाला स्पर्श करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने करीत आहेत. दरम्यान, या घटनेचे बुधवारी बेलापुरात तीव्र पडसाद उमटले.
हे पण वाचा :- जत्रा पाहायला गेलेल्या चार अल्पवयीन मुलींवर सामुहिक बलात्कार
विद्यार्थी, पालक, तसेच ग्रामस्थांनी संबंधित प्राध्यापकावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाविद्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. या वेळी आंदोलकांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून सदर प्राध्यापकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत कोणालाही पाठीशी घालणार नाही असे आश्वासन संस्थेकडून देण्यात आले.
हे पण वाचा :- 5 वर्षे मंत्री राहूनही जे राम शिंदेना करता आले नाही ते रोहित पवारांनी महिन्यात करून दाखवले !