मुख्यमंत्री उध्दव ठाकरे थिल्लर, सरकार चालवयाला दम लागतो : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे थिल्लरपणे भाषा वापरतात. त्यांच्यात सरकार चालवयाला दम लागतो तो त्यांच्यात नाही असा सणसणीत टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज लगावला.

अतिवृष्टी आणि महापूरामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी फडणवीस आज माढा आणि करमाळा दौर्यावर आले होते. पाहणी दरम्यान पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर हल्ला बोल केला.

केंद्र सरकारने नेहमीच महाराष्ट्राला मदत केली आहे. आता लोकांना मदतीची गरज आहे अशा वेळी केंद्राकडे मदतीचं बोट दाखवण्याऐवजी त्यांनी हिम्मत असेल तर शेतकऱ्यांना मदत करावी.

तसेच केंद्र सरकारने कर्ज काढून राज्याच्या जीएसटीचे पैसे दिले आहेत असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आरोपाचे ही त्यांनी खंडन केले.

राज्याने ५० हजार कोटी कर्ज घेतले आहे आणखी ७० हजार कोटी काढण्याची राज्याकडे क्षमता आहे असे सांगत कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करा.

आम्ही शेतकऱ्यांना केंद्राच्या मदतीची वाट न बघता शेतकर्यांना १० हजार कोटी मदत केल्याचेही सांगत अजित पवार दिशाभूल करत असल्याचा आरोपही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करावी. टोलवाटोलवी नको आहे,

राज्य सरकार काय करणार आहे हे स्पष्टपणे सांगावे अशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मागणी असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24