मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार ‘ही’ शपथ !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवार, दि. १८ मे रोजी दुपारी १ वाजता विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत.

विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सर्व ९ उमेदवारांचा शपथविधी सोमवारी विधान परिषदेत सभापतींच्या उपस्थित पार पडणार आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या कालवधीच्या आत ते आमदार म्हणून शपथ घेणार आहेत.

त्यांच्या सोबतच महाविकास आघाडी आणि भाजपचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवारही शपथ घेणार आहेत.

कोरोना व्हायरसचे संकट असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर राजकीय वाद उभा ठाकला होता.

अखेर विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला

शपथ घेणारे आमदार पुढीलप्रमाणे

उद्धव ठाकरे – शिवसेना
निलम गोऱ्हे – शिवसेना

राजेश राठोड – काँग्रेस

शशिकांत शिंदे – राष्ट्रवादी
अमोल मिटकरी – राष्ट्रवादी

रणजितसिंह मोहिते पाटील – भाजप
गोपीचंद पडळकर – भाजप
प्रवीण दटके – भाजप
रमेश कराड– भाजप

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24