मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद आणि महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद आणि महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे.कारण राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीला मंजरी दिली नाही तर उद्धव ठाकरे आमदार होऊ शकणार नाहीत – त्यामुळे उद्धव ठाकरे यांना २८ मे नंतर लगेचच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. ठाकरे यांना सहा महिन्यात राज्याच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य बनणं अनिवार्य होत.

मुख्यमंत्री ठाकरे सध्या विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचवण्यासाठी विधीमंडळाचा सदस्य बनणं आवश्यक आहे.

सध्या कोरोनामुळे विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. या परिस्थितीत घटनात्मक पेच निर्माण होऊ नये यासाठी राज्यपाल कोट्यातून उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याची शिफारस राज्य मंत्रिमंडळात एकमताने घेण्यात आला. 

राज्य मंत्रिमंडळाच्या ९ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव तयार करून त्याच दिवशी तो राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आला होता. मात्र आठवडा उलटून गेला तरी राज्यपालांनी त्याला मंजुरी दिलेली नाही. राज्यपालांची मंजुरी मिळाली नाही तर  ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद आणि परिणामी महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत येऊ शकते.

राज्य सरकारच्या या प्रस्तावाला राज्यपालांनी अद्याप मंजुरी दिलेली नाही. यापूर्वीही महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त दोन रिक्त जागांसाठी फेब्रुवारी २०२० ला दोन नावांची शिफारस राज्यपालांकडे केली होती.

आता उद्धव ठाकरे यांच्या नावालाही एक आठवडा उलटला तरी राज्यपालांनी मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे राज्यपाल याला मंजूरी देणार की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24