पक्षातील गटबाजी मिटवण्यासाठी ‘भैय्यां’ च्या चिरंजीवांनी घेतला पुढाकार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून शहर शिवसेनेतील गटबाजीने डोके वर काढले आहे. पक्षातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने आरोप – प्रत्यारोप केले जात आहे.

यामुळे शहरातील शिवसेनेची प्रतिमा मलीन होऊ लागली होती. आता भैय्या नाही, मात्र शिवसेनामध्ये सुरु असलेली गटबाजी मोडून काढण्यासाठी आता खुद्द दिवंगत नेते अनिल भैय्या यांचे चिरंजीव विक्रम राठोड आता मैदानात उतरले आहे.

मनपाच्या स्थायी समितीचे सभापतीपद आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून पक्षांतर्गत राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमिवर आता राठोड यांचे चिरंजीव विक्रम यांनी पुढाकार घेतला आहे.

पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी आज एकत्र येत राठोड यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे मान्य केले असून लवकरच हे सर्वजण पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी जाणार असल्याचे सांगण्यात आले.

महापालिकेतील राजकारणावरून शिवसेनेतील वाद उफाळून आले आहेत. राज्यात आघाडीचे सरकार आहे, त्यामुळे नगर शहरातही असेच राजकारण व्हावे या उद्देशाने शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांनी यात लक्ष घातले.

राष्ट्रवादीला पाठिंबा द्यायला सांगत शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतला त्यामुळे राष्ट्रवादीचा सभापती झाला. मात्र, हा उमेदवार भाजपमधून आलेला असल्याने

राष्ट्रवादी आणि भाजपने मिळून शिवसेनेवर मोठी खेळी केल्याची भावना निर्माण झाली. त्यातच स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरूनही शिवसेनेत आपसांत मतभेद झाले. जातीयवाद होत असल्याचेही आरोप झाले.

वरिष्ठ पातळीवर एकामागून एक तक्रारी होत आहेत. हे सर्व सुरू असताना गडाखांचे समझोत्याचे प्रयत्नही अयशस्वी होत असल्याचे दिसून आले.

आता विक्रम राठोड सक्रीय झाले आहेत. पक्षाच्या नगरसेवकांची बैठक झाली. जे नगरसेवक राष्ट्रवादीकडे गेले किंवा झुकल्याचा आरोप होत होता, तेही यावेळी उपस्थित होते. या सर्वांनी राठोड यांचे नेतृत्व मान्य करण्याचा निर्णय घेतला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24