अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे सर्वत्र नद्या, नाले, ओढे, धरणे यांना मुबलक पाण्याचा साठा जमा झालेला आहे.
यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस झालेला असतानाही देखील जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात पाण्यासाठी नागरिकांची होत असलेली वणवण यामुळे काँग्रेस पक्षाने आज नगर पंचायतीच्या कार्यालयाच्या बाहेर हंडा मोर्चा आंदोलन केले.
याबाबत समजलेली माहिती अशी कि, पालिकेकडुन अनेकदा रात्र-अपरात्री सोशल मिडीयाद्वारे संदेश पाठवुन अचानकपणे उद्या पाणी येणार नसल्याचे सांगितले जाते.
त्यामुळे नागरीकांची गैरसोय होते. शहरात नियमित स्वच्छ पाणी पुरवठा करावा, पाणी पुरवठ्याबाबाबत काही निरोप असल्यास नगरसेवकांना तातडीने पाठवावा.
त्यामुळे नागरीकांची गैरसोय होणार नाही. पाण्याची प्रभागानिहाय तपासणी करुन पाण्याचा दर्जा सुधारावा. अन्यथा तीव्र आंदोलन करुन पालिकेच्या अधिकाऱ्यांना काळे फासणार असल्याचा इशारा अनिल कांबळे यांनी दिला.
उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्यासह नगरेसवक फंड छल्लारे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत विविध मागण्याचे निवेदन दिले.
दिलीप नागरे, सुभाष तोरणे, दीपक कदम, रितेश एडके उपस्थित होते. शहरातील पाणी पुरवठा यंत्रणा विस्कळीत झाली असुन ती तातडीने दुरुस्त करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved