अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- नगर जिल्हा हा जिल्ह्यातील खड्डे, नादुरुस्त रस्ते अशा नागरी समस्यांनी नावाजलेला आहे. खासदार, आमदार, मंत्री असताना देखील जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग खुंटला आहे.
याचा सर्वाधिक त्रास केवळ आणि केवळ सर्वसामान्य नागरिकास सहन करावा लागतो आहे. महसूलमंत्र्यांचा तालुका म्हणून प्रसिद्ध असलेला संगमनेर तालुक्यातील रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबीफाटा, आंबीदुमाला ते म्हसवंडी या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे.
रस्त्यावरील खडीही निघून गेली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करताना छोट्या-मोठ्या वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असल्याने ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले आहे. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांनाही याच रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती.
त्यामुळे संपूर्ण रस्त्याचे काम व्हावे म्हणून दोन्ही गावच्या नागरिकांनी संबंधित विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. काही काम झाले मात्र, संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरू करत खडीही टाकली. दरम्यानच्या काळात पुढे काम न झाल्याने आता रस्त्यावरील खडी सुद्धा निघून गेली आहे.
या समस्येला वैतागून ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले असून, लोकप्रतिनिधींसह संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन रस्त्यांचे कमी तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved