अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहरातील घरघुती स्वरुपाच्या कचऱ्याचे घरातच ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करुन तो वेगवेगळ्या कचरा पेटीत साठवून ठेवावा.
कचरा संकलन करण्यासाठी येणाऱ्या घंटागाडीमध्येच ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे टाकावा. ओला कचऱ्याचे घरीच कंपोस्टींग करुन खत तयार करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात सहकार्य करावे.
सर्वेक्षणावेळी नागरिकांना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची सकारात्मक उत्तरे द्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त राहुल द्विवेदी यांनी केले आहे.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आपल्या महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये भाग घेतलेला आहे. या अंतर्गत “नागरीकांचा सहभाग” या घटकातील तपासणीसाठी केंद्र शासनाचे पथक ४ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२० दरम्यान आपल्याला फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून स्वच्छ सर्वेक्षण २०२० संदर्भात सात प्रश्न विचारणार आहे.
या प्रश्नांची नागरीकांनी सकारात्मक उत्तरे देवून आपल्या शहराला स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये जास्तीत जास्त गुणांकन मिळवून देण्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : सावेडीत हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या अड्डाच्या पर्दाफाश