अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात सुरु असलेला मुसळधार पावसामुळे चोहीकडे पाणीचपाणी झाले आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे रस्ते वाहून गेले.
तर काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेले असल्याने नागरिकांना येण्या जाण्यासाठी मार्गच राहिला नाही. असाच काहीसा प्रकार शेवगाव तालुक्यातील हसनापूर या गावी झाला आहे.
दरम्यान या बाबत समजलेली माहिती अशी कि, तालुक्यातील हसनापूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणा-या नाथनगर येथील ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने पावसाळयात त्यांचे आतोनात हाल होत आहेत.
दैनंदिन गरजांसाठी रस्त्यातील ओढे नाले पार करत चिखल तुडवावा लागत असल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून लोखंडी पूल तयार करत तात्पुरता पर्याय शोधला आहे.
दरम्यान अनेक वर्षापासून रस्त्यावाचून होणारी ही परवड सहन करत येथील रहिवाशांनी अनेकदा लोकप्रतिनिधी व विविध विभागाकडे निवेदने दिली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
दरम्यान लोकसहभागातून ओढयावरील लांबी येवढा लोखंडी जाळीचा छोटेखानी पुल तयार करुन घेतलाआहे. मात्र उर्वरीत रस्ता कच्चा असल्याने नागरीकांची परवड काही थांबत नाही.
वस्तीवर जाण्यासाठी पक्का रस्ता मिळावा यासाठी येथील ग्रामस्थांनी तहसिलदार अर्चना भाकड यांना निवेदन दिले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved