अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- भिंगार, नगर-पाथर्डी रस्त्यावरील नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीत येणार्या विजय लाईन चौकातील अनाधिकृत टपर्यांचे अतिक्रमण वाहतुक कोंडीला व अपघाताला कारणीभूत ठरत आहे.
सदरील अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी या भागात राहणार्या नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. सदर अतिक्रमण हटविण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रीय महामार्ग व जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले.
नागरदेवळे (ता. नगर) ग्रामपंचायत हद्दीत येणार्या भिंगार जवळील विजय लाईन चौकात मोठ्या प्रमाणात टपर्यांचे अतिक्रमण वाढले आहे.
चौकात वाढलेल्या अतिक्रमणच्या विळख्याने दररोज वाहतुक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तर अनेक लहान-मोठे अपघात देखील घडत आहे.
टपर्याबरोबरच पक्के बांधकाम देखील करण्यात येत आहे. सदर अतिक्रमण विशाखापट्टणम राज्य महामार्गावर असल्याने येथील दुकानात येणारे ग्राहक रस्त्यावर वाहने लावत असल्याने वाहतुक कोंडीत भर पडत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
ग्रामपंचायतीस यासंबंधी तक्रार केली असता कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचा आरोप नंदू भंडारी यांनी केला आहे. तातडीने या निवेदनाची दखल घेऊन सदरील टपर्यांचे अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved