रस्त्यावर फिरणाऱ्या त्या जोडप्याला पाहून नागरिक झाले भयभीत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- राहुरी तालुक्यातील मुळा नदीकाठावर फिरणाऱ्या एका जोडप्याला पाहून परिसरातील ग्रामस्थांचे तोंडाचे पाणी पळाले आहे. हे कपल खुलेआम फिरत असल्याने नागरिक चांगलेच भयभीत झाले आहे.

दरम्यान हे कपल दुसरे कोणी नसून खुद्द बिबट्या नर -मादी आहेत. वळण येथे मुळा नदीकाठावर नर-मादी बिबट्याची जोडी दोन बछड्यांसह फिरत आहे.

बिबट्याच्या या कुटुंब काफिल्याने मागील चार दिवसांपासून परिसरात दहशत निर्माण केली आहे. त्यांनी चार कुत्रे व एका वासराचा फडशा पाडला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची रात्रीची झोप उडाली आहे.

काल (गुरुवारी) रात्री वनखात्याने उपलब्ध करून दिलेला पिंजरा लावण्यात आला आहे. परिसरातील अनेक नागरिकांना बिबट्यांच्या कुटुंबाचे दर्शन घडले आहे.

तर काहींनी नर-मादी व एक बछडा; तर, काहींनी मादी व दोन बछडे पाहिले. वळण येथे मुळा नदी पात्रात पाणी आहे. आसपास ऊसाचे मोठे क्षेत्र आहे. बिबट्यांना लपण्यास भरपूर जागा आहे.

त्यामुळे, या भागात बिबट्यांनी ठाण मांडले आहे. नागरिकांनी बंद पडलेले पथदिवे सुरू केले आहेत. रात्रीच्या वेळी घरांच्या व गोठयांच्या जवळ पुरेसा उजेड राहण्यासाठी व्यवस्था केली आहे.

दिवसाउजेडी शेतात जाण्यास ग्रामस्थ घाबरत आहेत. वनखात्याचे कर्मचारी लक्ष्मण किनकर यांनी तत्काळ एक पिंजरा उपलब्ध करून दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24