Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Citroen C3 Aircross : Creta ला टक्कर देण्यासाठी Citroen सज्ज; स्टाइलिश लुकसोबत बाजारात लॉन्च करणार आलिशान कार; जाणून घ्या फीचर्स

Citroen C3 Aircross : हुंदाई Creta ला भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला आहे. मात्र आता या शक्तिशाली कारला टक्कर देण्यासाठी Citroen India बाजारात एक नवीन कार आणणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या कारचे नाव Citroen C3 Aircross हे आहे. तुम्हाला या कारमध्ये उत्कृष्ट फीचर्स तसेच जबरदस्त पॉवरट्रेन पाहायला मिळतील. तसेच, कंपनीने ही कार 5 आणि 7 सीटर दोन्ही लेआउटमध्ये सादर केली आहे. तज्ज्ञांच्या मते, कंपनीची ही कार ह्युंदाई क्रेटालाही थेट टक्कर देऊ शकेल. यासोबतच या कारमध्ये जबरदस्त सेफ्टी फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

Citroen C3 Aircross Features

कंपनीने या कारमध्ये उत्कृष्ट फीचर्स दिले आहेत. वायरलेस ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी, 10.2-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, मल्टीपल ड्राइव्ह मोड्स, यूएसबी चार्जिंग स्लॉट, डे नाईट IRVM आणि क्रूझ कंट्रोल यांसारखी धनसू वैशिष्ट्ये यामध्ये पाहता येतील.

Citroen C3 Aircross Safety Features

सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ही Citroën कार अतिशय प्रभावी मानली जाते. यामध्ये कंपनी एअरबॅग्ज, पार्किंग सेन्सर्ससह रियर व्ह्यू कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, हिल होल्ड असिस्ट आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये देऊ शकते.

Citroen C3 Aircross Powertrain

या कारमध्ये 1.2 लीटर NA पेट्रोल इंजिनसोबत 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. हे इंजिन जास्तीत जास्त 82 PS पॉवरवर 115 Nm पीक टॉर्क आणि 110 PS पॉवरवर 190 Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असेल. यात 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळेल. मात्र, कंपनीने या कारची किंमत जाहीर केलेली नाही.