मनसेच्या जिल्हाध्यक्षाचा बंगला फोडून दीड लाखाची चोरी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नगर :- सराफ व्यावसायिक तथा मनविसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत वर्मा यांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला. घरात कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी तब्बल दीड लाखाचा ऐवज लांबवला.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित संतोष वर्मा यांचा माणिकनगर येथील चंदन इस्टेटमध्ये चंद्रमोती नावाचा बंगला फोडून चोरट्यांनी फोडला. घरातून साड्या, टीव्ही चोरट्यांनी चोरून नेला.

ही घटना माणिकनगर परिसरात २२ ते २४ जूनदरम्यान घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सराफ वर्मा यांच्या बहिणीचे ३० मे रोजी लग्न झाले.

लग्नासाठी आणलेल्या साड्या, टीव्ही घरात होता. वर्मा सहकुटुंब बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी घरातील १ लाख १८ हजार रुपये किमतीच्या ३० साड्या व २२ हजारांचा टीव्ही लांबवला.

सोमवारी सायंकाळी घरात चोरी झाल्याची माहिती वर्मा यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी कोतवाली पोलिस स्टेशनला माहिती दिली. 

अहमदनगर लाईव्ह 24