महाराष्ट्र

पुढील चोवीस तासात ‘या’ भागात थंडीची लाट : हवामान खात्याने दिला इशारा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  मागील दोन दिवसापासून राज्यात थंडीत प्रचंड वाढ झाली असून ग्रामीण भागात तर थंडीने कहरच केला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील चोवीस तासात थंडीची लाट येणार असल्याची माहिती दिली आहे.

किमान आणि कमाल तापमानात मोठी घट होणार असून रात्री किंवा पहाटेच नव्हे तर दिवसभर वातावरणात गारवा राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातील किमान तापमान १० अंश सेल्सिअस खाली राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव , औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड मध्ये काही ठिकाणी किमान तापमान १० अंश सेल्सिअस पर्यंत खाली येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office