अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- काल बारावीचा निकाल जाहीर झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या संकटाचा सामना करत अंतिमतः हा निकाल देण्यात आला.
या निकालानंतर शहरातील सर्व नामांकित महाविद्यालयांनी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. शुक्रवारपासूनच विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरता येणार असून
जुलै महिना अखेरपर्यंत अर्ज भरण्यास महाविद्यालयांकडून मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी आपल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या पुणे ,अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये वाणिज्य शाखेच्या प्रवेशासाठी सुमारे ५० ते ५५ हजार जागा उपलब्ध आहेत.
त्यातील सुमारे ३० ते ३५ हजार जागा पुणे जिल्ह्यासाठी ११ ते १२ हजार जागा नाशिक जिल्ह्यासाठी आणि सुमारे ६ हजार जागा अहमदनगर जिल्ह्यासाठी आहेत.
त्याचप्रमाणे विज्ञान शाखेसाठी तीनही जिल्ह्यांसाठी सुमारे ३० ते ३२ हजार जागा उपलब्ध आहेत. त्यातील बहुतांश जागा पुणे जिल्ह्यासाठी आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com