अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी फेसबुक लाईव्ह द्वारे महाविद्यालये सुरु होण्या बाबत वक्तव्य केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत या बाबत चर्चा करून २० जानेवारी पर्यंत निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.
राज्यातील महाविद्यालये जवळपास मागच्या मार्च पासून बंद असल्याचे सांगण्यात आले आहे. शनिवारी लाईव्ह द्वारे त्यांनी प्राचार्य,प्राध्यापक व विध्यार्थी यांच्या सोबत संवाद साधला आहे,यावेळी ते बोलत होते.विध्यार्थ्यांच्या आरोग्याची व सुरक्षिततेची खबरदारी घेऊन ५०% विद्यालये सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे.
राज्याचे महाविद्यालये जर चालू झाली तर विदयार्थ्यांना शाळा,कॉलेजमध्ये जात येईल असे त्यांच्या वतीने सांगण्यात आले. प्राध्यापक भरती,महाविद्यालयांचे प्रश्न,प्रवेश प्रक्रियेतील अडथळे,महाविद्यालयांची परिस्थिती या सर्वांचा त्यांनी आढावा घेतला.
तसेच येत्या १० दिवसां मध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.राज्याचे तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शालेय आणि महाविद्यालयीन विदयार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.