आ. रोहित पवार यांना भाजप प्रवेशाचे निमंत्रण, रोहित पवार म्हणाले आपणच एकत्र काम करुयात ना !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- आ.रोहीत पवार यांनी अल्पावधीतच अनेकांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर त्यांचं फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. यात सर्वपक्षीय समर्थक आहेत.

अशाच एका फॉलोअरने ट्वटिटरवर आ.रोहित पवार यांना उज्वल राजकीय भवितव्यासाठी भाजप प्रणित एनडीए मध्ये येण्याचं निमंत्रण दिले.

या फॉलोअरने लिहिले की, भाजप आणखी बराच काळ सत्तेत असणार आहे. महाविकास आघाडीत राहून तुम्हाला कधी मुख्यमंत्री पदाची संधी मिळणार नाही.

तुम्ही एनडीए मध्ये यायला हवं. या ट्विटला आ.रोहित पवारांनी अतिशय संयत शब्दांत उत्तर दिले. आ.पवार यांनी लिहिलं की, “राजकारणात कुणाला कोणत्या पदावर बसवायचं हे जनता ठरवत असते.

मी कुठल्या पदासाठी काम करत नाही,तसं असतं तर कदाचित आजवर पदही घेतलं असतं. NDA त प्रवेश करायचं म्हणाल,

तर आपल्या मताचा आदर आहे, पण लोकशाहीत कोणताही पक्ष कायम सत्तेत नसतो, माझी शैली आवडत असेल तर आपणच एकत्र काम करुयात ना.!”

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reservedpp

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24