अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- राज्याचे माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल राजूर येथे जाऊन माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे त्यांकडून सांगण्यात आले आहे.
परंतु ही सदिच्छा भेट होती की राजकीय भेट होती याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर हेही उपस्थित होते.
काल दुपारी आ. विखे पाटील राजूर येथे गेले. तेथे त्यांनी पिचड पिता-पुत्र व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांचा विखे पाटील यांनी सत्कार केला.
सुमारे तासभर त्यांची पिचड पिता पुत्र व गायकर यांचे सोबत बैठक झाली. त्यानंतर मात्र या बैठकीविषयी अनेक तर्क वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com