अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्र बंद ठेवण्यात आले. त्यानंतर राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु केली. परंतु अजूनही काही क्षेत्रे सरकारने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
यात जिम, हॉटेल, मंदिरे यांचा समावेश आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात जिम पुन्हा सुरु कराव्यात अशी मागणी जीमचालक सरकारकडे करत आहेत.
याच प्रश्नांसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राज्यातील जिम चालक भेटले होते. त्यावेळी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार जिम सुरु करा असं सांगत राज ठाकरेंनी थेट ठाकरे सरकारला आव्हान दिलं होतं.
आता याबाबत आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, कोरोनाबाबत सरकार सर्व प्रयत्न करत असतानाही काहीजण नियमांकडं दुर्लक्ष करतात.
पण लोकांची काळजी घेण्याची दक्षता रेस्टॉरंट/जिम/क्लास चालक घेत असतील तर त्यांना परवानगी देण्यास हरकत नाही,असं माझं व्यक्तिगत मत आहे.
याबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा अशी विनंती करत सरकार याबाबत निर्णय घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून लवकरात लवकर जिम सुरु करा,
अशी मागणी केली होती. राज्यातील दारू दुकाने उघडली जात असताना जिम मात्र बंद ठेवल्या जातात, हे अतिशय दुर्दैवी आहे, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे व्यक्त केले होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved