अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- राष्ट्रवादीचे आमदार आणि खा. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांची राजकारणावरील पकड जबरदस्त आहे. त्यांनी तसे आपल्या विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले. कर्जत जामखेड मध्ये त्यांनी विद्यमान मंत्र्यांचा पराभव केला होता.
त्यानंतर त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये जिल्हा प्रशासनावर देखील पकड बसवली. आता आ. पवार यांनी अहमदनगरचे मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेकडे आपला मोर्चा वळवला आहे.
त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ‘राजकारण्यां’चे ते लक्ष वेधून घेतील यात शंका नाही.
दरम्यान, आज (शुक्रवार) सकाळी आ. रोहित पवार यांनी जिल्हा परिषद गाठत कर्जत-जामखेड तालुक्यातील झेडपीच्या अखत्यारितील प्रलंबित विषय आणि प्रश्नाबाबत अधिकार्यांची बैठक घेतली.
कोणालाही कल्पना न देता आ. पवार जिल्हा परिषदेत पोहचले. ही माहिती अध्यक्षा राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रतापराव पाटील शेळके यांना मिळताच ते जिल्हा परिषदेत पोहचले.
दरम्यान, आ. पवार यांनी विभागनिहाय जिल्हा परिषदेकडील मतदारसंघातील प्रश्न मांडले. ते सोडविण्यास राज्य पातळीवर अडचण असल्याच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पत्राव्दारे ते कळवा आणि त्याची एक प्रत मला द्या, यासंदर्भात मंत्रालय आणि राज्य सरकार पातळीवर पाठपुरावा करून ते सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, आ. पवार यांचे मिनिमंत्रलयात डोके घालणे सत्ताधारी गटाला फायदेशीर आहे परंतु त्यावर विरोधी भाजपचा गट यावर काय भूमिका घेणार, आ. पवार यांच्या जिल्हा परिषदेतील हस्तक्षेपाला विरोध करणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved