Maharashtra News : इतर वेळी न्यायालयात आपल्या अशिलांची बाजू हिरहिरीने मांडणाऱ्या वकिलांची बाजू आता आमदार सत्यजीत तांबे विधिमंडळात मांडणार आहेत. वकिलांवर होणारे हल्ले, त्यांच्याविरोधात दाखल होणारे खोटे गुन्हे
अशा अनेक समस्या घेऊन कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आ. तांबे यांची भेट घेतली. हे मुद्दे आपण विधान परिषदेत नक्की मांडू, असं सांगत आ. तांबे यांनी या विद्यार्थ्यांना आश्वस्त केलं.
दिवसेंदिवस वकिलांवर होणारे हल्ले व धमक्या तसेच वकिलांवर सुडबुध्दीने खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. वकील हा महिला किंवा पुरुष त्यांचे कामकाजाचे कर्तव्य निभावत असताना सदर सर्व गोष्टींपासून तसेच प्रशासनाकडून संरक्षण मिळाले पाहिजे.
महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण वकील वर्गाला पथकर माफ होऊन त्यासाठी नियोजनात्मक शासकीय परिपत्रक काढा. ज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य, विधान परिषदेमध्ये पदवीधर, शिक्षक अशा स्वरुपाचे मतदार संघ राखीव आहेत,
त्याच प्रमाणे वकील मतदार संघ हा देखील वकील वर्गासाठी राखीव ठेवावा, अशा मागण्यांचे निवेदन विद्यार्थ्यांनी आ. तांबे यांना दिले आणि आमचे प्रश्न व मागण्या हिवाळी अधिवेशनात मांडव्यात, अशी विनंती केली.
सत्यजीत तांबे आमदार झाल्यापासून सातत्याने विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावत आले आहेत. विद्यार्थ्यांसाठी नेहमीच तत्पर असणारे व त्यांना न्याय मिळावा, यासाठी झटणारे आ. सत्यजीत तांबे यांनी त्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवत त्यांना पाठींबा देण्याचे आश्वासन दिले.
लवकरच आ. तांबे विद्यार्थ्यांचे प्रश्न हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेच्या सभागृहात मांडणार आहेत, असेही आ. सत्यजीत तांबे यांनी सांगितले.