अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- महाराष्ट्रात सर्वत्र धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाने सर्वांच्या तोंडाचे पाणी पळवले. परंतु आता दिलासादायक वृत्त आले आहे.
ज्या महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण होते त्या राज्यात आता कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये आणि मृत्यूच्या संख्येतही घट होत आहे. काल दिवसभरात राज्यात 8522 नवीन रुग्णांचे निदान करण्यात आलं.
तर 187 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. तर 15 हजार 353 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. देशातील कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 79% रुग्ण 10 राज्यांमध्ये आहेत.
यामध्ये सर्वात जास्त 25.38% महाराष्ट्रात आहेत. तर केरळमध्ये हे प्रमाण 11.26% आहे. आता केरळपाठोपाठ कर्नाटकातही कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.
देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तरी नव्या रुग्णांच्या बाबतीत आता कर्नाटकाने महाराष्ट्राला मागे टाकलं आहे. कर्नाटकात महाराष्ट्रापेक्षाही जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 7,089 तर कर्नाटकात 7,606 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या देशाचे लक्ष लशीकडे लागले आहेत.
भारतात तीन लशींचे उत्पादन प्रगतीपथावर आहे. यात ‘सीरम इन्स्टिटयूट’, ‘झाइडसकॅडिला’ आणि ‘भारतबायोटेक’ या तीन कंपन्यांकडून कोरोनाची लस तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे लस मिळेपर्यंत काळजी घ्या असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved