अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. आर्थिक घडी पुरती विस्कटलेली आहे. देशभराचा विचार करता महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण जास्त आहे. मुंबई, पुणे यांसारख्या मेट्रोसिटीमध्ये हे प्रमाण लक्षणीय राहिले.
पुण्यात एकूण संख्या ही दीड लाखांच्या जवळ गेली आहे. परंतु आता पुण्यात रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. आठवढाभरापूर्वी पुण्यात दररोज 1800 ते 2 हजारांच्या आसपास नव्या रुग्णांची भर पडत होती.
सोमवारी दिवसभरात 391 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली तर 917 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. गेल्या 5 महिन्यांमधली ही सर्वात निच्चांकी वाढ आहे. त्यामुळे प्रशासनाला थोडा दिलासा मिळाला आहे.
पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1 लाख 49 हजार 790 एवढी झालीय. तर सध्या 14841 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर मृत्यूची संख्या ही 3 हजार 679 एवढी झाली आहे.
तर आत्तांपर्यंत 1 लाख 31 हजार 270 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना विरुद्ध झुंज देणाऱ्या महाराष्ट्रात दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. नव्या पेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढल्याने राज्याचा Recovery Rate हा 80 टक्क्यांवर पोहोचला आहे.
सध्या देशाचे लक्ष लशीकडे लागले आहे. देशात सध्या तीन लसींवर चाचणी सुरु आहे. भारत बायोटेक-आयसीएमआरची कोव्हॅक्सिन, झायडस कॅडिलाची झायकेव्ह-डी तसेच ऑक्सफोर्ड-अस्ट्रॅजेनेका आणि सीरमने तयार केलेली कोव्हीशील्ड ही लस सध्या चाचणीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved