अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अनैतिक संबंधाच्या वादातून कंपनीच्या वर्कशॉप मॅनेजरचा सात ते आठ जणांनी केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाला.
हरिश्चंद्र किसन देटे (वय 45, रा. भैरवनगर, धानोरी, विश्रांतवाडी. मूळ रा. रुई ढोकी, ता. जि. उस्मानाबाद) असे खून झालेल्या मॅनेजरचे नाव आहे.
चाकण एमआयडीसी परिसरातील व्हीएचडी इंजिनिअरिंग वर्कशॉप कंपनीत ही घटना घडली आहे.
याप्रकरणी जीवन डोंगरे, अश्विन कांबळे, शरद धुळे आणि त्याच्या आणखी 2 ते 3 साथीदारांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरिश्चंद्र किसनराव देठे यांची चाकण एमआयडीसीत व्ही.एच.डी. इंजिनिअरिंग नावाची कंपनी आहे.
देटे व डोंगरे या दोघांमध्ये एका महिलेबरोबर असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून वाद होते. यातून सोमवारी सकाळी दोघांमध्ये हाणामारी झाली.
देटे यांना लाथा-बुक्यांनी आठ जणांनी बेदम मारहाण केली. यात देटे यांचा मृत्यू झाला.देठे यांची हत्या केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पोबारा केला.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com