शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ! शिवसेनेचा ठाकरे गटाचा वचननामा प्रसिद्ध

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्रावर केंद्राकडून सातत्याने होणाऱ्या अन्यायापासून मुक्ती देण्याबरोबरच परराज्यात जाणारे उद्योगधंदे थांबवून महाराष्ट्राचे वैभव पुन्हा प्राप्त करून देऊ. तसेच देशात आणि राज्यात इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर कोणताही दुजाभाव न करता सर्व राज्यांना विकासाची समान संधी देणार, अशी ग्वाही देत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी आपल्या पक्षाचा वचननामा प्रसिद्ध केला.

शेतकऱ्यांची ही पिळवणूक थांबवून आम्ही त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करू. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाईल, असे आश्वासन या वचननाम्यात देण्यात आले आहे. युतीत असतानाही आमचा वचननामा वेगळा यायचा, असे सांगत ठाकरे यांनी ‘जुमलापत्र’ असा भाजपच्या जाहीरनाम्याला टोला मारला.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी पार पडणार आहे. त्यापूर्वी ठाकरे यांनी गुरुवारी मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेत शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध केला. गद्दारी करून महाविकास आघाडीचे सरकार पाडल्यानंतर महाराष्ट्र लुटण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू झाला. केंद्राचा त्याला आशीर्वाद आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळवले जात आहेत.

हिरे व्यापार, क्रिकेटचा सामना, फिल्मफेअर कार्यक्रम आदी सर्वच गोष्टी पळवल्या जात आहेत. एकंदरीत महाराष्ट्राचे वैभव लुटले जात आहे. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर ही लूट लूट आम्ही थांबवू, असे या वेळी ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचे वैभव वाढत असताना, केंद्राकडून दुजाभाव करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला

अद्ययावत आरोग्य सुविधा पुरवणार
राज्यात गेल्या काही दिवसांपासून आरोग्य यंत्रणाचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे अद्ययावत आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यात येईल. सरकार जीएसटीच्या रूपात शेतकऱ्यांकडून हजारो रुपयांचा टॅक्स वसूल करत आहे. त्या बदल्यात ६ हजार रुपये देत आहे.

शेतकऱ्यांची ही पिळवणूक थांबवून आम्ही त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करू. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाईल. तसेच पिकाचे नुकसान झाल्यास जो पीकविमा मिळतो, त्यासाठी अनेक जाचक अटींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. या सर्व जाचक अटी खाजगी कंपन्यांनी ठरवलेल्या आहेत. त्या बदलून आम्ही योग्य ते निकष लावून शेतकऱ्यांना लवकरात लवकर कसा विमा मिळेल याची तरतूद करू, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.