पदवी परीक्षेचा गोंधळ; ऑफलाईन वाल्यांचे हाल तर ऑनलाईन वाले रेंजमुळे बेहाल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- विद्यापिठाच्या अंतिम परीक्षांचा गोंधळ काही केल्या मिटेना. अनेक संभ्रमानंतर अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरु करण्यात आल्या. काहींना ऑनलाईन तर काहींना ऑफलाईन. परंतु येथेही विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

ऑफलाईन पेपर दोन तासांपेक्षा अधिक वेळ उशिराने सुरू झाला. तर दुसरीकडे ऑनलाईन परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना रेंज नसण्याच्या अडचणीला समोरे जावे लागले.

राज्य सरकारच्या आदेशानुसार पुणे विद्यापीठांतर्गत पद्वीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा काल सोमवारपासून पुणे विभागातील पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यात सुरू झाल्या.

90 टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडला तर दहा टक्के विद्यार्थी ऑफलाइन परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, सकाळी दहा वाजता सुरू होणार्‍या पहिल्या पेपरला अडचण आली.

पेपरची वेळ दहाची असताना विद्यापीठाकडून प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठीचा ओटीपी (वन टाईम पासवर्ड) महाविद्यालयांना वेळत मिळाला नाही.

त्यामुळे दहाचा पेपर तब्बल 12 वाजता सुरू झाला, तर एक वाजता असणारा पेपर तब्बल चार वाजता सुरू झाला. दुसरीकडे ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना घरीच कॉम्प्युटर किंवा मोबाइलवर परीक्षेची सोय होती.

परंतु अनेक ठिकाणी घरात नेटवर्कची समस्या असल्याने विद्यार्थ्यांनी घराबाहेर, झाडाखाली किंवा इतर ठिकाणी परीक्षा दिली. परंतु त्यातही अधूनमधून नेटवर्कची अडचण येत होती, अशी माहिती विद्यार्थ्यांकडून समजली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24