अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- निवडणूक शपथपत्रात दोन गुन्ह्यांची माहिती दडवल्याच्या प्रकरणाच्या पुढील सुनावणीत कुठल्याही परिस्थितीत न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश नागपूरच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले होते.
या प्रकरणात फडणवीस यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. न्यायालयात अनुपस्थित राहिल्यामुळे झालेला विलंब माफ करण्यात यावा, अशी मागणी करणारी पुनर्विलोकन याचिका (रिव्ह्यू पिटिशन) फडणवीसांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
यावर आता ही याचिका दाखल का करून घेण्यात येऊ नये, यावर सर्वोच्च न्यायालयात आता सुनावणी होणार आहे.
न्यायालयीन शिस्तीनुसार एखादे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापुढे असताना इतर न्यायालयांत त्याच प्रकरणावरील सुनावणी घेता येत नाही वा ती तहकूब होते, असे संकेत आहेत.