अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- पहीले राष्ट्र मग पक्ष असा आमचा अजेंडा आहे. काँग्रेस हा देशाला झालेला कँन्सर आहे तो समुळ नष्ट झाला पाहीजे. राज्यातील सरकारचे अस्तीत्व अल्पकाळाचे आहे.
भाजपामुळे शिवसेना वाढली आहे , सेनेमुळे भाजपाचे अस्तीव वाढलेले नाही. राज्यातील सर्व पक्षाने भारतीय जनता पक्षाला फसविले मात्र जनतेने आमच्या बाजुने कौल दिला होता
असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी यांनी केले. पाथर्डी येथील नगरपालिकेच्या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी करण्यात आला.
यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिध्यक्ष अरुण मुंढे होते. यावेळी महात्मा गांधी व लालबहादुरशास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माणिक खेडकर, अशोक चोरमले,राहुल राजळे, सोमनाथ खेडकर, नितीन दहीवाळकर, नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, मंगल कोकाटे,
महेश बोरुडे, अनिल बोरुडे उपस्थीत होते. सावजी म्हणाले, काँग्रेस पक्षाने सत्तर वर्षे जातीपातीमधे व धर्मा-धर्मात भांडणे लावली. भारतीय जनता पक्षाने काश्मीरसह सर्व देशात एकच कायदा लागु केला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved