अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- देशासह राज्यात प्रत्यक निवडणुकीत आता तिसऱ्या नंबरवर येणाऱ्या आणि हळूहळू संपवण्याच्यामार्गी असेलेल्या काँग्रेस पक्षाला जाग आण्यासाठी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस विनायकराव देशमुख महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना खुल पत्र लिहिल आहे.
त्यांनी ह्या पत्रात म्हटले आहे कि काँग्रेस जागे हो, हिच वेळ आहे जागे होण्याची. अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होईल. केवळ “महाविकास आघाडी सरकारचा एक भागीदार” आणि त्यातुन मिळालेली काही मंत्रीपदे, एवढ्यावर समाधानी राहून चालणार नाही.
एका बाजूला शिवसेनेची मुख्यमंत्री पदाची ताकद तर दुसरया बाजुला राष्ट्रवादीची आक्रमकता,अशा परिस्थितीत गावोगावचे काँग्रेस कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. सरकारमध्ये काँग्रेसचाही सहभाग आहे, हे काँन्ग्रेसच्या हितचिंतकांना, कार्यकर्त्यांना जाणवायला हवे. सरकारच्या निर्णयात काँन्ग्रेसच्या ध्येय धोरणांचा प्रभाव दिसायला हवा.
राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्यांच्या कार्यकर्त्यांना ” शिवसेनेशी जुळवून घ्या “,अशा सुचना देण्यात आल्या आणि त्याचदिवशी भिवंडीतील १८ काँग्रेस नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश सोहळा झाला. हा केवळ योगायोग नव्हे. काँग्रेस नेत्यांना या घटनांचा अर्थ नक्कीच समजत असेल.
काही दिवसांपूर्वी आमच्या नगर जिल्ह्यातील पारनेर येथील काही नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.त्यावेळी राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय नेत्यांनी त्यात तातडीने हस्तक्षेप करून या नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेत पाठविले. त्यावेळी महविकास आघाडीच्या घटक पक्षातील परस्पर संबंधांची चर्चा झाली.
आणि किमान आप आपसातील कार्यकर्त्यांचे पक्षांतर टाळले जाण्याची अपेक्षा व्यक्त झाली. मग भिवंडीतील काँग्रेस नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश कसा काय दिला जातो ?असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पडतो. याबाबत काँन्ग्रेस नेत्यांनी तिन्ही पक्षाच्या समन्वय समितीत हे प्रश्न विचारायला हवेत.
अन्यथा तीन पक्षांच्या “महाविकास आघाडी सरकार” मध्ये सर्वात मोठा तोट्यातील पक्ष काँग्रेस पक्ष ठरेल. काँग्रेसच्या ज्येष्ठ व श्रेष्ठ नेत्यांनी या घटनांचा गंभीरपणे दखल घेण्याची गरज आहे.