अहमदनगर लाईव्ह 24 टीम / सोलापूर : “भाजपकडून फोन टॅपिंग करुन खालच्या थराचं राजकारण केलं गेलं. समोरासमोर उभं राहून त्यांना सामना करता येत नाही म्हणून ते पाठीत खंजीर खुपसतात”, असा घणाघात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
“लोकांची सुरक्षा काढून घेणं, फोन टॅप करणं या गोष्टी अतिशय चुकीच्या आहेत. आम्ही याचा निषेध करतो”, अशा शब्दात प्रणिती शिंदे यांनी भाजपवर टीका केली.
फडणवीस सरकारच्या काळात भाजपकडून विरोधी पक्षातील नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे. यासंदर्भात प्रणिती शिंदे यांना प्रश्न विचारले असता त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.
का बरखास्त करण्याची मागणी आम्ही केली आहे. आतापर्यंत अनेक असे भ्रष्टाचार दिसून आले आहेत आणि याच पद्धतीचं राजकारण भाजप करते”, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली.