अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : विकासाच्या माध्यमातून मतदारसंघाचा कायापालट करणे हीच आपली विकासपूर्तीची संकल्पना असल्याचे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.
देवीभोयरे येथील विविध विकासकामांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सीमा जाधव होत्या.
यावेळी शिवाजीराव जाधव, उपसरपंच दत्तात्रय बेलोटे, अशोक मुळे, माजी सरपंच विठ्ठल सरडे, संपत वाळुंज, माजी उपसरपंच विकास सावंत, विश्वनाथ गाजरे, भाऊसाहेब सरडे, पांडुरंग बेलोटे, बाबुराव मुळे, गोपीचंद बेलोटे, ग्रामसेवक जगदाळे उपस्थित होते.
आमदार लंके म्हणाले, मतदारसंघातील गाव असो, वाडीवस्ती असो त्या ठिकाणी विकासकामे झाली पाहिजे यासाठी आपण नियोजन केले आहे. येत्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्याचा आपण संकल्प केला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews