जेव्हा तुमचा बाप मान खाली करुन इंग्रजांचे पाय चाटत होते तेव्हा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई – सीएए आणि एनआरसी मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला टीकेचे लक्ष्य केले आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ठिकठिकाणी निदर्शने आणि आंदोलन केली जात आहेत.  अशाच एका कार्यक्रमात नामदार  जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर निशाना साधला. 

यावेळी आव्हाड म्हणाले की ‘जेव्हा तुमचा बाप मान खाली करुन इंग्रजांचे पाय चाटत होते तेव्हा आमचा बाप फाशीच्या दोरीचं चुंबन घेत इन्कलाब जिंदाबादचे नारे देत होते’.

पुढे बोलताना आव्हाड म्हणाले की, केंद्र सरकारने आणलेला नागरिकत्व सुधारणा कायदा संविधानाच्या विरोधात असून याविरोधात आपण स्वत: ठाणे येथे पहिले आंदोलन केले.

जोपर्यंत हा कायदा केंद्र मागे घेत नाही, तोपर्यंत जेथे जेथे आंदोलन होईल, तेथेतेथे मी सहभागी होणार आहे. देशात पारधी समाज मोठ्या प्रमाणात असून त्यांच्याकडे नागरिकत्व सिद्ध करणारी कोणतीही कागदपत्रे नाहीत.

अहमदनगर लाईव्ह 24