नामांतराचा वाद… मनसे महसूलमंत्री थोरातांना १०,००० पत्र पाठवणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- हिंदू धर्माचे दैवत छत्रपती संभाजी महाराज हे बाळासाहेब थोरातांच्या स्मरणात रहावे यासाठी व औरंगाबाद जिल्ह्यचे नाव बदलून संभाजी महाराज नगर करावे ह्या मागणीला केलेला विरोध बाळासाहेब थोरात यांनी मागे घ्यावा त्यासाठी मनसेच्या वतीने संभाजीनगर चे आमचे जिल्हा अध्यक्ष सुहास दशरते यानी जो 26 जानेवारी पर्यंत नामांतराचा अल्तिमेटम दिला.

तो पर्यंत आज 5 जानेवारी पासुन मनसेच्या व जनतेच्या वतीने ‘छत्रपती संभाजी महाराज कि जय’ असा जयघोष पोस्टकार्ड वर लिहुन जिल्ह्यातून दहा हजार पत्र बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर च्या घरच्या पत्यावर पाठवणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्मान सेनेने औरंगाबाद चे नामांतर संभाजीनगर करा. अशी मागणी केली असुन त्या मागणीला मनसे नगर जिल्ह्याचा पाठिंबा आहे. हि मागणी जोर धरत असतांना महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यास विरोध दर्शविला.

मतांच्या राजकारणासाठी जर काँग्रेस छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करत असेल आणी तो विरोध नगर जिल्ह्यातुन बाळासाहेब थोरात करीत असतील तर मनसे शांत बसणार नाही.

महाराजांच्या नावाला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला सत्तेत राहण्याचा कुठलाच अधिकार नाही. दरम्यान पत्र पाठवण्याची मोहीम मनसेचे जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ यांच्या उपस्थितीत सुरु होणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24