देशात आजपासून देण्यात येणार कोरोनाचा बुस्टर डोस

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आजपासून बूस्टर डोस देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शासकीय, महापालिका तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर आज सोमवारपासून फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस दिला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 60 वर्षांवरील कमी प्रतिकारशक्ती असलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोरोनाची तिसरी लस, अर्थात बूस्टर डोस देण्याची घोषणा केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर्स यांनाही बूस्टर डोस देणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार हे लसीकरण सुरू होत आहे.

राज्यातील सर्व शासकीय, महानगरपालिका तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी तसेच थेट येवून नोंदणी पद्धतीने ही सुविधा उपलब्ध असेल.

करोना लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेले आरोग्य सेवक , आघाडीवर (फ्रंटलाईन) काम करणारे सेवक तसेच 60 वर्षे वा त्यावरील सहव्याधी असलेल्या

ज्येष्ठ नागरिकांनी दुसरी मात्रा घेतल्याच्या तारखेपासून 9 महिने किवा 39 आठवडे पूर्ण झाले असल्यास ते दिनांक 10 जानेवारी 2022 पासून प्रतिबंधात्मक मात्रा घेण्यासाठी पात्र असतील.

बुस्टर डोससाठी नियमावली

– कॉमोरबिडीटी (Comorbidity) असल्याचे दाखविण्यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र, प्रिस्क्रिप्शनची गरज नाही.. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बुस्टर डोस घेण्यात यावा.

– ज्यांनी दुसरा डोस घेऊन 9 महिने झाले असतील, अशांनाच ‘बुस्टर डोस’ दिला जाणार आहे.

– बूस्टर डोससाठी ऑनलाइन आणि थेट लसीकरण केंद्रावर नोंदणी करता येणार.

– बूस्टर डोस घेतल्यानंतर लाभार्थ्यांच्या लस प्रमाणपत्रावर त्याचा तसा स्पष्ट उल्लेख असेल.