कोरोना ब्रेकिंग : निष्काळजीपणा भोवतोय … अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासांत विक्रमी रुग्णवाढ !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.रोज वाढणारे हे आकडे नवे आव्हान घेऊन येणार असल्याने चिंतेचं वातावरण वाढतंय.

विक्रमी रुग्णवाढ :- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत विक्रमी रुग्णवाढ झाली आहे, गेल्या २४ तासांत ५५९ नवे रुग्ण वाढले असून उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या अडीच हजारांवर गेली आहे.  

अहमदनगर शहरात सर्वात जास्त रुग्ण :- नगर शहरात सर्वाधिक २२९ रुग्ण आढळले असून जिल्ह्यातील इतर तालुक्यांतही कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होते आहे. 

निष्काळजीपणा भोवतोय : अहमदनगर जिल्ह्यातकोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत असतानाच शहरातली गर्दी मात्र काही ओसरत नाहीए.सोशल डिस्टनसिंगचं पालन कुठेही होताना दिसत नाही.ह्यामुळेच कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. 

जिल्ह्यात आज २३५ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७७ हजार २६५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.४० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५५९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २५४६ इतकी झाली आहे. 

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २९८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २४१ आणि अँटीजेन चाचणीत २० रुग्ण बाधीत आढळले.जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४३, अकोले १६, जामखेड २२, कर्जत ०३, कोपरगाव ३७, नगर ग्रामीण ०८, नेवासा ०५, पारनेर ०९, पाथर्डी ०३, राहाता ०२, राहुरी ०२, संगमनेर १८, शेवगाव १२, श्रीरामपूर १०, कॅन्टोन्मेंट ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ७४, अकोले ११, जामखेड ०२, कोपरगाव १३, नगर ग्रामीण ०६, नेवासा ०९,  पारनेर ०६, पाथर्डी ०५, राहाता ३४,  राहुरी १२, संगमनेर ३७, शेवगाव ०९, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर १३ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.अँटीजेन चाचणीत आज २० जण बाधित आढळुन आले. मनपा १२, नेवासा ०१, राहाता ०३, श्रीरामपूर ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये :- मनपा ५८, अकोले ०१, जामखेड ०६, कर्जत १६, कोपरगाव २१, नगर ग्रामीण ०८, नेवासा १३, पारनेर १६, पाथर्डी १२,  राहाता ३०, राहुरी ०७, संगमनेर २७, शेवगाव ०५, श्रीगोंदा ०१ श्रीरामपूर ०१, कॅन्टोन्मेंट ०७ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:७७२६५
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:२५४६
  • मृत्यू:११७७
  • एकूण रूग्ण संख्या:८०९८८

अहमदनगर शहरात आणखी कंन्टेन्मेंट झोन :- नगर शहरासह उपनगरी भागात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ लागला असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी नगर महापालिका क्षेत्रात शनिवारी (दि.१३) बोल्हेगाव परिसरात ३ ठिकाणी मायक्रो कंन्टेन्मेंट झोन जाहीर केल्या नंतर सोमवारी (दि.१५) दुपारी आणखी ३ ठिकाणी मायक्रो कंन्टेन्मेंट झोन जाहीर केले आहेत. यामध्ये बालिकाश्रम रस्त्यावरील काही भाग, सिव्हील हडकोपरिसरातील काही भाग व कोहिनूर मंगल कार्यालय परिसरातील जयश्री कॉलनीचा समावेश आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

 

अहमदनगर लाईव्ह 24